धुळे | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांच्या पैशांना आणि प्रकल्पांना या सरकारने विरोध केल्यास हे सरकार उलथवून टाकू, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या शुक्रवारी जिल्ह्यात सभा झाल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.
काँग्रेसच्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. यावरूनही फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सत्तेसाठी लाचारी स्वीकारलेली शिवसेना मूग गिळून गप्प आहे. सत्तेसाठी शिवसेनेच्या वाघाची मांजर झाली असून ती आता डरकाळीऐवजी दिल्लीच्या ‘मातोश्री’साठी म्यॉव म्यॉव करीत असल्याची कडवट टीका त्यांनी केली आहे.