मुंबई – गेल्या आठवडाभरापासून नवनियुक्त मंत्र्यांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज सकाळी जाहीर झाले आहे. दरम्यान,खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या पारड्यात महत्त्वाची खाती टाकली आहे. राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झालेल्या सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या खात्यांची जबाबदारी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here