_________________
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना 64 कोटी रुपयांची नळपाणी योजना रत्नागिरी शहरासाठी मंजूर केली. मात्र गेल्या काही वर्षांत ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. या योजनेसह शहरात पाणीवितरणात शिवसेना कमी पडली आहे. विकासनिधी अखर्चिक राहिला असून हा मतदारांचा अपमान आहे. नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजप नक्की विजयी होणार असून रखडलेली पाणी योजना पुढील दीड वर्षात पूर्ण करू, असा विश्वास माजी आमदार बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला. शहर विकासाचा रोडमॅप तयार आहे, रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर, देखणे बनवण्यासाठी आमच्याकडे संकल्पचित्र असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते.
*शिवसेनेने मतदारांचा अपमान केला*
पाच वर्षांसाठी रत्नागिरीची थेट नगराध्यक्ष निवडणूक झाली होती. मात्र शिवसेनेने नगराध्यक्षांचा जाणीवपूर्वक राजीनामा घेतला गेला. शिवसेनेने मतदारांचा अपमान केला. विकास योजनांचा बोजवारा उडाला आहे. यात शिवसेना अपयशी ठरली आहे. आम्ही आठवड्याचे 24 तास योजना नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू. मुबलक पाणी मिळाले पाहिजे. पानवल धरणाचे पुनरुज्जीवन करू. शीळ धरणातील पाण्याचा योग्य विनीयोग व्हावा, रस्ते उद्याने यासाठी निधी आणू, असे श्री. माने म्हणाले.
*दुसर्या टप्प्यावर प्रचार सुरू*
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार अॅड. पटवर्धन म्हणाले की, पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आता दुसर्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. यापूर्वीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेतला जातो याबाबत नागरिकांमध्ये कमालीचा रोष आहे. शहरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे. 29 ला मतदानातून हा रोष व्यक्त करतील व प्रस्थापितांना नक्कीच धक्का मिळेल. भाजप चांगला विजय मिळवेल.
भाजप वरिष्ठांच्या आदेशानुसार लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांना मताधिक्य मिळाले. परंतु विधानसभेत युतीचे सरकार सत्तेत आले नाही. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. लोकांमध्येही संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावरच लढवणार असल्याचे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले. शिवसेनेने मताधिक्याचा अनादर करून तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील
आम्ही सच्चे मित्रच!
अॅड. पटवर्धन व मी गेली 40 वर्षे मित्र आहोत. राजकारणात विजयी होण्याकरिता सच्चा मित्राची गरज असते. याकरिता सर्वजण मिळून काम करतोय. ऐतिहासिक विजय मिळवू. दीपक मित्रच आहे, त्यामुळे कोणतेही गटतट नाहीत. तांत्रिक मतभेद होते ते संपले आहेत. हा पक्ष आम्ही सार्यांनी वाढवला आहे, त्यामुळे वादाचे कारण नाही. कोणीही उगाच वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये.
www.konkantoday.com
Of course, your article is good enough, baccarat online but I thought it would be much better to see professional photos and videos together. There are articles and photos on these topics on my homepage, so please visit and share your opinions.