CAA, NRC वरुन मोर्चे निघत आहेत, निदर्शनं केली जात आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की हा कायदा झाल्यानंतर अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये हा कायदा घटनेला धरुन आहे की नाही? हे स्पष्ट व्हायचं आहे. हा कायदा झाला म्हणजे कुणालाही देश सोडून जावा लागेल अशा गैरसमजात कोणीही राहू नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. नागपुरातल्या पत्रकार परिषदेत ही बाब त्यांनी स्पष्ट केली. कोणतीही भीती, कोणतीही दहशत मनात बाळगू नका. तुमच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार समर्थ आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं