नवं वर्ष लागण्यापूर्वी म्हणजेच १ जानेवारी २०२० पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच शेतकऱ्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सिंचन घोटाळ्याबाबत जी क्लीन चिट मिळाली त्याबाबत नो कॉमेंट एवढीच प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं होतं त्यावर विचारलं असता, “कुणाला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय शरद पवार घेतील. शरद पवार जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. संजय राऊत काय म्हणाले ते मी वाचलेलं नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here