ठाकरे’ सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील नाराजांनी हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेतही मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. रामदास कदम शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचंही बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here