सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे आज (मंगळवार) दुपारी १२ वाजता आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. यासाठी सोळंके पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोळंके यांनी राजीनाम्याची कल्पना पक्षाध्यक्ष शरद पवारांना दिली आहे. मात्र ते पवारांची भेट घेणार नाहीत असे सुत्रांकडून समजते. मराठवाडय़ातून राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश टोपे आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लावली आहे.