मुंबई- ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. तसेच त्यांच्याकडे वित्त खातं सोपवलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु रोहित पवार यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिल्यानं या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यांनीच या नाराजीनाट्यावर पडदा टाकला आहे.
टीव्ही 9शी बातचीत करताना ते म्हणाले, राज्यात अनेक लोक फिरत असतात, त्यात मीसुद्धा आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही.