सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपा पुरस्कृत समविचारी गटाने विजय मिळवला आहे. अजित पवार यांनी जातीनं लक्ष घातल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पण विजयसिंह मोहिते पाटील आणि करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या खेळीमुळे बहुमत असतानाही महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी स्वत: सोलापूरमधील नेत्यांना बोलवून सूचना दिला होत्या. पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला साथ दिली. शिवसेनेचे अनिरूध्द कांबळे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे त्रिभुवन धाईंजे यांचा ३७-२९ मत फरकाने पराभव केला.