अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीला मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांने बाजी मारत नगर जिल्हा परिषदेत सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार राजश्री घुले यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या फॉर्म्युल्याला राज्य स्तरावर यश मिळाल्यावर जिल्हा परिषदेत देखील यश मिळाले आहे.
भाजपकडून मोठे शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवाराचा निवडणूकीचा अर्ज दाखल केला होता. परंतु भाजपचे उमेदवार असलेले खेडकर यांनी माघार घेतली. त्यामुळे नगरमध्ये महाविकासआघाडीसमोर भाजपचे आव्हान संपुष्टात आले. या कारणाने महाविकासआघाडीच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार राजश्री घुले यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे.