मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी
मुंबई : मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना संधी न देता पक्षाने तीन अपक्ष आमदारांना संधी दिल्याने हा नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरातून प्रकाश आबिटकर, मराठवाड्यातून परभणीचे राहूल पाटील, उस्मानाबादमधील भूम परंडाचे आमदार तानाजी सावंत, कोकणातून सहा वेळा आमदार असलेल्या गुहागरचे भास्कर जाधव, विदर्भातील रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांना संधी देण्यात आलेली नाही. उघडपणे हे आमदार नाराजी व्यक्त करत नसले तरी पक्षांतर्गत मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचा सूर आहे.