सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीची सत्ता कायम राखता आली आहे.
सोलापूर : येथील जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीची सत्ता कायम राखता आली आहे. तर महाराष्ट्र विकासआघाडीचा पराभव झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, प्रतिष्ठेची केलेल्या जिल्हा परिषदेत मोहिते पाटील यांनी बाजी मारत आपली खेळी यशस्वी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज जिल्हा परिषद सभागृहात निवडणूक पार पडली. भाजप समविचारी आघाडीकडून करमाळ्यातील अनिरुद्ध कांबळे यांनी अध्यक्ष पदासाठी तर मंगळवेढ्यातील दिलीप चव्हाण यांनी उपाध्यक्ष पदासाठी बाजी मारली.