विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन झाली असली, तरी राजकीय भूकंप सुरूच आहेत. भाजपाचे राज्यातील महत्त्वाचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे फडणवीस यांच्याविरोधातील नाराजी पहिल्यांदाच समोर आली आहे. स्वतःच्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट मिळू दिल नाही. त्यामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर अनेक आरोप केले आहेत.

राज्याच्या सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या भाजपात आता नाराजीचा सूर अधिक गडद होऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here