नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव माजी खासदार डी.पी त्रिपाठी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी हानी झाली आहे. भारतीय राजकारणातील गाढा अभ्यासक हरपल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एका जेष्ठ मार्गदर्शकाला मुकला आहे अशा शोक भावना मंत्री ना.छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
राजकारणातील गाढा अभ्यासक हरपला… – भुजबळ
राजकीय अभ्यास आणि दांडगा जनसंपर्क असल्याने त्या काळात काँग्रेसशी जोडले गेले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते राजकीय सल्लागार होते. विविध भाषांचा अभ्यास असल्याने त्यांनी देशात आणि देशाबाहेरील विविध विद्यापीठामध्ये मार्गदर्शन देखील केले होते.