जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षिरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काॅग्रेसचे डॉ. सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असून प्रमुख विरोधीपक्ष म्हणून भाजपाला झटका बसला आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले असून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. हाच पॅटर्न जिल्हा परिेषदेतही राबविण्यात आला. ज्या पक्षाचा जास्त सदस्य त्या पक्षाचा अध्यक्ष तर दुसऱ्या क्रमांकाची सदस्य संख्या असलेल्या पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचा फार्मुला वरीष्ठ पातळीवरच ठरला आहे.
उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. गायकवाड यांचे नावाला वरीष्ठांनी पसंती दर्शविली. आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजपाच्या उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज माघारी घेतल्याने संबंधितांची बिनविरोध निवड झाली. आघाडीत कॉग्रेसला ही सामावून घेण्यात आले असून एक समिती या पक्षाला देण्याचे ठरले आहे.