मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर आज नव्या नंत्र्यांना राहण्यासाठी शासनाकडून बंगल्यांच वाटप करण्यात आलं. यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र त्यांच्या पसंतीचा बंगला देण्यात आला आहे. अजित पवारांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला देण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरेंचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांना मत्रालयासमोरील अ-6 बंगला देण्यात आला आहे. भाजप सरकारच्या काळात हा बंगला तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आला होता. यावेळी हा बंगला आता आदित्य ठाकरेंना देण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत, अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी, राजेश टोपे यांना जेतवन, दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा बंगला देण्यात आला आहे.