मुंबई : पुढारी ऑनलाईन
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात आणली असून राज्यसरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र शिवभोजन थाळीच्या योजनेमध्ये विविध अटी घालण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात राज्य शासनानं एक जीआर काढला आहे. सध्या राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळ्या मिळणार आहेत.