नवी दिल्ली: करोना व्हायरसनंतर जवळपास तीन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. सध्या वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आयसीसीने एक नियमावली तयार केली असून त्यानुसार सुरक्षित वातावरणात सामना होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामने प्रेक्षकांशिवाय मोकळ्या मैदानात होत आहे. या सामन्याचे यशस्वी आयोजन झाल्याने आता अन्य देशात पण पुन्हा सुरू करण्याच्या आशा तयार झाल्या आहेत.

वाचा-
वेस्ट इंडिजनंतर पाकिस्तान इंग्लंड दौऱ्यावर टी-२० आणि कसोटी मालिके खेळणार आहे. त्या पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा चार सप्टेंबरपासून सुरू होईल. या दौऱ्यात ३ टी-२० सामने आणि ३ वनडे सामने होतील. द डेली टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार टी-२० सामने ४,६ आणि ८ सप्टेंबर रोजी होतील. टी-२० मालिकेनंतर १०,१२ आणि १५ सप्टेंबर रोजी वनडे सामने होतील.

वाचा-
ऑस्ट्रेलियाचा संघ एका खासगी विमानाने इंग्लंडला जाईल. हे सर्व सामने साउथम्पटन आणि मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होतील.

वाचा-
या दोन्ही ठिकाणावर संघातील खेळाडू, मॅचचे अधिकारी आणि प्रसारकांना राहण्याची सोय आहे. याच मैदानांवर आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिका होत आहे. पाकिस्तानविरुद्धची मालिका याच ठिकाणी खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने गेल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यासाठी २६ जणांची निवड केली आहे.

वाचा-
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला आहे. या मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने बायो सिक्युअर हा नियम मोडल्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर करण्यात होते. आर्चरच्या आधी वेस्ट इंडिजचे कोच फिल सिमन्स हे सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले होते. तेव्हा वेस्ट इंडिज बोर्डातील सदस्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. सिमन्स यांचे निलंबन करण्याची मागणी तेव्हा करण्यात आली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here