नवी दिल्ली: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये चाहते जगभरातून दाखल झाले आहेत. फुटबॉलच्या चाहत्यांची क्रेझ ही वेगळीच असते. अशाच एका चाहत्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. चाहत्याने ही स्पर्धा पाहण्यासाठी जे काही केले त्याचा खुलासा एक सामना सुरू असताना झाला.

फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी मॅक्सिकोच्या एका चाहत्याने स्वत:च्या लग्नासाठी बचत करून ठेवलेले पैसे खर्च केले आणि थेट कतार गाठले. आता एवढी मोठी चूक केल्यानंतर त्याने मैदानात आल्यावर आपल्या भावी पत्नीकडे सर्वांसमोर माफी देखील मागितली.

वाचा- फक्त एक टी-२० मॅच खेळणाऱ्याचे नाव कर्णधारपदासाठी; माजी खेळाडू म्हणाला, टीम इंडियाचे नशीब बदलेल

संबंधित चाहत्याने मॅक्सिकोची मॅच सुरू असताना एका मोठ्या कागदावर लिहले होते की, प्रियसी मला माफ कर. मी कतारला येण्यासाठी आपल्या लग्नासाठी साठवलेले पैसे खर्च केले आहेत. स्पर्धेत मॅक्सिकोने पहिली मॅच पोलंडविरुद्ध खेळली. ही मॅच ड्रॉ झाली. तर दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने त्यांचा २-० असा पराभव केला. आता त्यांची पुढील लढत सौदी अरब विरुद्ध होणार आहे.

फिफा वर्ल्डकपला २० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. याआधी क्रोएशियन मॉडेल इवाना नोलने भडक कपडे घातले होते. कतारमध्ये कडक नियम असताना देखील इवानाने भडक कपडे घातले होते. तर पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील लढतीत एका प्रेक्षकाने सेव्ह युक्रेन आणि रिस्पेक्ट फॉर इरानियन वुमन असे लिहलेला ध्वज घेऊन मैदानात प्रवेश केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानाबाहेर काढले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here