वाचा-भावी पत्नीला म्हणाला, मला माफ कर; लग्नासाठी साठवलेले पैसे घेऊन थेट गाठलं…
रिपोर्ट्सनुसार, ज्या सुटमध्ये डेव्हिड बेकहॅम थांबला होता. त्या सुटच्या एका रात्रीचे भाडे २० लाख रुपये आहे. बेकहॅम हॉटेलच्या टॉप फ्लोअरमध्ये थांबला होता. ज्यात डायनिंग, कोर्टयार्ड आणि खासगी पूल आणि जिमचा समावेश होता.
वाचा- तुम्हाला चोराला कोणती शिक्षा द्यायची आहे? कतार पोलिसांचा महिला पत्रकाराला प्रश्न, पाहा
अर्थात एक आठवडा थांबल्यानंतर बेकहॅमने चेकआउट केले. असे म्हटले जाते की अनेक चाहत्यांना कळाले होते की तो या हॉटेलमध्ये थांबला आहे आणि त्यामुळे हॉटेलच्या बाहेर मोठी गर्दी होत होती.
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार बेकहॅमने येथे स्वत:चा खासगी शेफ देखील ठेवला होता. त्याच्या जेवणात जपानी डिशचा समावेश अधिक होता. पॅपराजीपासून वाचण्यासाठी बेकहॅम नेहमी खासगी लॉबीमधून हॉटेलमध्ये येत असे.
वाचा- वर्ल्डकपसाठी आलेल्या खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड इथे राहतात; २ हजारहून अधिक…
फुटबॉलमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्ष झाली असली तरी डेव्हिड बेकहॅमच्या चाहत्यांची संख्या जगभरात आज देखील आहे. फुटबॉल वर्ल्डकप २०२२च्या आधी कतारने त्याला देशाचा ब्रॉड अॅबेसडर केले होते. १० वर्षाच्या करारासाठी बेकहॅमने १५० मिलियन पाउड घेतले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times