वाचा: रोहित शर्मानंतर भारताला पुन्हा धक्का, आणखी दोन खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर
रोहित शर्माच्या या अप्रतिम खेळीवर त्याची पत्नी रितिका सजदेह हिने प्रतिक्रिया दिली. रितिकाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आणि लिहिले की, ‘मी तुझ्यावर प्रेम करते, तू ज्या प्रकारचा व्यक्ती आहेस त्याचा मला खूप अभिमान आहे.’

हेही वाचा: बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचा नवा कॅप्टन, आता या खेळाडूच्या खांद्यावर देणार संघाची जबाबदारी
रोहित शर्माने केवळ २८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ५१ धावा केल्या. एका क्षणी असे वाटत होते की रोहित शर्मा हा सामना भारतासाठी जिंकेल, पण शेवटची काही षटके टीम इंडियासाठी चांगली गेली नाहीत आणि त्यामुळे भारताच्या हातातून सामना निसटला.
विशेष म्हणजे, बुधवारी खेळवण्यात आलेला दुसरा एकदिवसीय सामना गमावण्याबरोबरच, टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिकाही गमावली आहे, बांगलादेशने आता मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशमध्ये भारताने वनडे मालिका गमावण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. भारताच्या खेळाडूंनी प्रयत्न केले खरे पण ते अपुरे पडले.
वाचा: जखमी रोहित शर्मा खेळला पण तरीही भारत हरला, पराभवासह टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात
हा पराभव टीम इंडियासाठी फारच त्रासदायक ठरला आहे, कारण टीम इंडियाने बांगलादेशमध्ये वनडे मालिका गमावण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. २०१५ च्या सुरुवातीला टीम इंडिया ३ सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी बांगलादेशला पोहोचली होती, जिथे बांगलादेशने त्यांना २-१ ने पराभूत केले होते. याशिवाय भारताने बांगलादेशमध्ये दोन वनडे मालिकाही जिंकल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times