नवी दिल्ली: अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याच बरोबर आयसीसीने ही घोषणा देखील केली की २०२३चा वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यान अंतर ठेवण्याच्या दृष्टीने तसेच भारताला या दोन्ही स्पर्धांचे यजमानपद मिळावे यासाठी करण्यात आल्याचे दिसते.

वाचा-
२०२१ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन करण्याची भारताची तयारी आहे. पण ऑस्ट्रेलियात होणाऱ्या २०२०चा स्थगित केल्यामुळे त्यांनी आयसीसीला २०२१ मध्ये होणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्याची विनंती केली आहे. अशा परिस्थितीत २०२२ साली होणाऱ्या वर्ल्ड कपचे यजमानपद भारताला दिले जाऊ शकते. आयसीसीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार यामुळेच २०२१ आणि २०२२ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या स्थळाची अद्याप घोषणा केली नाही. कारण भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

वाचा-
वर्ल्ड कप स्पर्धांबाबत जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांच्या सहमतीने घेतला जावा, असे आयसीसीमधील एका सदस्याने सांगितले. जर २०२१च्या टी-२० वर्ल्ड कपचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाले तर भारतात सलग दोन वर्ल्ड कप होऊ शकता. पण तुम्ही सहा महिन्याच्या अंतराने भारतात दोन वर्ल्ड कप घेऊ शकत नाही.

म्हणाले…

याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क केला असते ते म्हणाले, हा असा एक निर्णय आहे जो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना मिळून घ्यायचा आहे. बीसीसीआय आणि यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे निर्णय घेताना एकमेकांना विश्वासात घेऊन, चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

वाचा-
ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप स्थगित झाल्यामुळे आयपीएलच्या १३व्या हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआय गेल्या काही दिवसांपासून त्याची तयारी करत आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

>> २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षात दोन टी-२० आणि एक वनडे वर्ल्ड कप होणार आहे.
>> २०२१चा टी-२० वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये होईल. याची फायनल १४ नोव्हेंबर २०२१ रोजी खेळवली जाईल.
>> २०२२ चा टी-२० वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल. याची फायनल १३ नोव्हेंबर रोजी होऊ शकते
>> २०२३ सालचा वनडे वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होईल याची फायनल २६ नोव्हेंबर रोजी खेळवली जाईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here