दुबई: आयसीसीने या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा स्थगित केला आहे. स्थगित करण्यात आलेला वर्ल्ड कप कधी होणार याबाबत अद्याप कोणताही माहिती दिली गेली नाही. आयसीसीच्या नियोजनानुसार २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षात दोन टी-२० आणि एक वनडे होणार आहे. आता ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप स्थगित झाल्यामुळे या स्पर्धेची तिकीटे ज्यांनी विकत घेतली आहे त्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा-
करोना व्हायरसमुळे आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित केला. अशा परिस्थितीत जर ऑस्ट्रेलियाने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन केले तर या वर्षी स्थगित झालेल्या वर्ल्ड कपची तिकीटे वैध राहतील. आयसीसीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार जर स्पर्धा २०२२ साली होणार असेल तर ज्यांनी तिकीट विकत घेतली आहेत त्यांना पैसे परत मिळू शकतील.

वाचा-
आयसीसीने टी-२० स्पर्धा स्थगित केली पण पुढील स्पर्धा कोणत्या देशात होणार हे मात्र अद्याप सांगितले नाही. कारण स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील काही मुद्दे भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशातील क्रिकेट बोर्डांना सोडवायचे आहेत. यावर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील टी-२ ० स्पर्धेसाठी आयसीसीने तिकीटांची विक्री सुरू केली होती आणि मोठ्या प्रमाणात विक्री देखील झाली आहे.

वाचा-
ज्यांनी टी-२० वर्ल्ड कप सामन्यांची तिकीटे विकत घेतली आहेत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. जर ऑस्ट्रेलियाने २०२१ची स्पर्धा आयोजित केली तर २०२०च्या स्पर्धेची तिकिटे २०२१ साठी वैध राहतील आणि तिकिटांवर नवी तारीख येईल. पण जर ऑस्ट्रेलिया २०२२ साली स्पर्धा आयोजीत करणार असेल तर संबंधितांना पूर्ण रक्कम परत केली जाईल.

वाचा-
स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख निश्चित होईपर्यंत खरेदी केलेल्यांना तिकीटे स्वत:कडे ठेऊ शकतात. तिकाटांचा पैसे परत देण्याचा आग्रह १५ डिसेंबरपर्यंत केला जाऊ शकतो. ऑनलाइनच्या माध्यमातून ३० दिवसाच्या आत पैसे परत घेता येतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here