विताली जोदोरोवेत्स्की कोण आहे?
(Vitaly Zdorovetskiy) एक रशियन YouTuber आहे ज्याने यापूर्वी देखील फुटबॉल सामन्यांमध्ये असे कृत्य केले आहे. वितालीने शर्ट न घालता छातीवर लिहिले होते की, ‘विताली गोट( Vitaly Goat)’… या ३० वर्षीय व्यक्तीने ब्राझीलमध्ये २०१४ विश्वचषक फायनलमध्ये असेच कृत्य केले होते. तेव्हाही त्याच्या अंगावर विचित्र चित्रे आणि गोष्टी लिहिलेल्या होत्या.
पॉर्न फिल्म्समध्ये काम करणाऱ्या विताली जोदोरोवेत्स्कीची एक गर्लफ्रेंड होती तिचे नाव किन्से वोलांन्स्की होते. तिने देखील असेच काहीसे केले आहे. २०१९ मध्ये चॅम्पियन्स लीग फायनल दरम्यान, लिव्हरपूल आणि टॉटनहॅम यांच्यातील सामन्यात तिने मिडफिल्डमधून धाव घेतली. त्यावेळी किन्सीने काळ्या रंगाची वन-पीस बिकिनी घातली होती. २०११ मध्ये अॅडल्ट फिल्म स्टुडिओ बँग ब्रॉससाठी पॉर्न आर्टिस्ट असलेल्या वितालीने नंतर असेच काम करत लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात केली.
‘X’ रेटेड यूट्यूब चॅनेल
विटाली जोदोरोवेत्स्कीचे YouTube वर १ करोड सब्सक्राइबर्स आहेत. तिथे तो नियमितपणे एक्स-रेट केलेले व्हिडिओ अपलोड करतो. २०१९ मध्ये वितालीची गर्लफ्रेंड किन्सीने बिकिनी घालून फुटबॉल मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. आता किन्से देखील खूप लोकप्रिय झाली आहे. इंस्टाग्रामवर तिचे ३ करोड फॉलोअर्स आहेत. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान वितालीशिवाय आणखी एक चाहता मैदानाच्या आत धावला. लिओनेल मेस्सीने पेनल्टीमध्ये बदल केल्यानंतर काही वेळातच ही घटना ७५व्या मिनिटाला घडली.
उपांत्य फेरीत मेस्सी
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या या चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे लिओनेल मेस्सीच्या विश्वविजेता बनण्याच्या आशा कायम आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times