या क्रिकेटपटूची पहिली चाचणी घेण्यात आली तेव्हा त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर त्याची दुसरी चाचणी घेतली आणि त्यामध्ये तो पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर त्याच्या एकूण चार करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. या चारही चाचण्यांमध्ये त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे पाहायला मिळाले आहे.
या क्रिकेटपटूला स्पेशल कारमधून दुसऱ्या शहरात पाठवण्यात आले आहे. या शहरात त्याला १० दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकीय टीम त्याच्यावर नजर ठेवून असणार आहे. १० दिवसांच्या आयसोलेशननंतर त्याची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येणार आहे.
हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…
सध्याच्या घडीला काही क्रिकेटपटू सरावासाछी मैदानातत उतरले आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी काही दिवसांपूर्वी सरावाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांची करोनाची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या १० क्रिकेटपटूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. तब्बल चारवेळा करोनाची चाचणी ज्याची पॉझिटीव्ह आली आहे तो आहे पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफ. आतापर्यंत रौफच्या चार करोनाच्या चाचण्या पॉझिटीव्ह आलेल्या आहेत. या त्याच्या चाचण्या लाहोर येथे घेण्यात आल्या होत्या. पण आता त्याला इस्लामाबादला पाठवण्यात आले आहे. १० दिवसांच्या आयसोलेशनंतर त्याची करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यावेळी जर रौफ पुन्हा पॉझिटीव्ह आला तर त्याला इंग्लंडच्या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. कारण काही दिवसांमध्येच इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे.
सध्याच्या घडीला पाकिस्तानचे काही क्रिकेटपटू हे इंग्लंडमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांना सध्याच्या घडीला करोना चाचणी करून क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाकिस्तान अजून बाकिच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये कधी पाठवणार, याची चाहते वाट पाहत आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times