पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक हा आपली पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. पण जर शोएब सानियाला भेटला तर त्याचे मोठे नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शोएब हा पत्नी सानिया आणि मुलगा इझहान यांना भेटू शकलेला नाही. कारण सध्याच्या घडीला सानिया ही भारतामध्ये आहे तर शोएब हा पाकिस्तानमध्ये आहे. करोना व्हायरस आल्यानंतर शोएबला सानियाला भेटता आलेले नाही. त्यामुळेच शोएब भारतात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

काहीही करून सानियाला भेटायचे आहे, असे शोएबने ठरवले आहे. कारण दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडला रवाना झालेले आहेत. त्याचबरोबर काही खेळाडू थोड्याच दिवसांमध्ये इंग्लंडला जाणार आहेत. पण या खेळाडूंबरोबर शोएबला इंग्लंडमध्ये जाता येणार नाही, असे म्हटले जात आहे. सानियाला भेटल्यानंतरच शोएब इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केलेली आहे. आता ३१ ऑगस्टपर्यंत तरी भारतातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होणार नाही. त्यानंतरच शोएबला भारतामध्ये येता येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण जर एवढ्या उशिरा जर शोएब भारतामध्ये आला तर तो इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार तरी कधी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण शोएबला पाकिस्तानमधून भारतात आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागेल. त्याचबरोबर भारतातून इंग्लंडमध्ये गेल्यावर त्याची करोना चाचणी होईल आणि त्यानंतर त्याला पुन्हा क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. हा सर्व कालावधी एका महिन्याचा असू शकतो. त्यामुळे शोएबला कदाचित इंग्लंडमध्ये क्रिकेटचा सामना खेळता येणार नाही, असेही म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला शोएब हा युवा खेळाडू राहीलेला नाही. त्यामुळे जर शोएब इंग्लंडमध्ये उशिरा पोहोचला तर या गोष्टीचा त्याच्या कारकिर्दीवर विपरीत परीणाम होऊ शकतो आणि त्याचे मोठे नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

पाकिस्तानमधील करोनाची परिस्थिती भारतापेक्षा बिकट असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे करोनाच्या परिस्थितीत पाकिस्तानच्या नागरिकांना भारतामध्ये प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णयही केंद्र सरकारला घ्यावा लागेल. त्याचबरोबर परदेशातून भारतात आलेल्या लोकांमुळे देशात करोना पसरला, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताबाहेरील लोकांना देशात लवकर घ्यायचे की नाही, हा मोठा प्रश्न सरकारपुढे असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here