मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकाने अर्जुन तेंडुलकर याने सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले आणि सर्वच ठिकाणाहून त्याच जोरदार कौतुक होत आहे. अर्जुनने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सोशल मीडियावर अर्जुनच्या या कामगिरीनंतर अनेक पोस्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सोबतच आता अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरने ही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर अर्जुनसाठी खास पोस्ट केल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुनने शतक झळकावल्यानंतरचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये तिने शतक झळकावल्याबद्दल अर्जुन तेंडुलकरचे कौतुक केले आहे. आज तुझी बहीण म्हणून मला अभिमान वाटत आहे, अशा पद्धतीचे कॅप्शन तिने पहिल्या व्हिडीओमध्ये दिले. नंतर सचिन आणि अर्जुनच्या रेकॉर्डबद्दलची एक पोस्ट केली आहे.

तिसऱ्या व्हिडिओमध्ये तिने कॅप्शन दिले, तुझी सर्व मेहनत आणि संयम हळूहळू नक्कीच रंगात येताना दिसतील. तर त्याने बॅट उंचावलेल्या पुढच्याच पोस्टवर तिने लिहिले कि, ही तर फक्त सुरुवात आहे.

Sara Tendulkar Post For Arjun

गोव्यासाठी रणजी ट्रॉफी पदार्पणात अर्जुन तेंडुलकरने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली आणि संपूर्ण मैदानावर फटकेबाजी केली. त्याची फलंदाजी पाहून विरोधी गोलंदाज चांगलेच गोंधळले होते. अर्जुनने १२० धावा केल्या, ज्यात १६ चौकार आणि २ दमदार षटकारांचा समावेश होता. सचिन तेंडुलकरने १९८८ च्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी पदार्पणात शतक झळकावले होते. आता अर्जुन तेंडुलकरने त्याच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे.

अर्जुन तेंडुलकर आयपीएलमधील प्रसिद्ध मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. पण अद्याप त्याला पदार्पणाची समाधी मिळाली नाही. आयपीएल २०२२ च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. तर यंदाच्या लिलावासाठीही एमआयने त्याला संघात कायम ठेवले आहे. त्याचा रणजी ट्रॉफीमधील फॉर्म पाहता त्याला आगामी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here