नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटचा इतिहास १४३ वर्षाचा आहे. इतक्या वर्षात अनेक रंजक सामने आणि विक्रमांची नोंद झाली आहे. अशीच एक अविश्वसनिय घटना क्रिकेटच्या इतिहासात १९३९ साली घडली होती. कसोटी क्रिकेटमधील सामना हा पाच दिवसांचा असतो. पण असा एक सामना होता जो १२ दिवस चालला. जाणून घेऊयात नेमक काय झाले होते त्या सामन्यात…

वाचा-
३ मार्च ते १४ मार्च या काळात कसोटी क्रिकेटमधील सर्वात दिर्घकाळ (The longest cricket in history)चाललेला सामना झाला. या कसोटीला (The Match) म्हणून देखील ओळखले जाते. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड () यांच्यातील हा सामना डरबन मैदानावर झाला होता. दोन्ही संघांनी मिळून १२ दिवसात १ हजार ९८१ धावा केल्या होत्या. या कसोटी सामन्यातील १२ दिवसांपैकी फक्त दोन दिवस खेळाडूंना विश्रांती देण्यात आली तर एक दिवस पावसामुळे खेळ झाला नाही. म्हणजे एकूण ९ दिवस क्रिकेट झाले.

वाचा-
टाइम लेस मॅच मध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात ५३० धावा केल्या. त्यात दोन शतक तर ३ अर्धशतकांचा समावेश होता. आफ्रिकेचा पहिला डाव ३ दिवस चालला. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने त्यांच्या डावाची सुरूवात केली. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ ३१६ धावा करू शकला. त्यांच्या एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही. पण इंग्लंडचे फलंदाज दोन दिवस मैदानात टिकले.

वाचा-
पाचव्या दिवशी आफ्रिकेने दुसऱ्या डावाची सुरूवात केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करत ४८१ धावा केल्या. उत्तरा दाखल इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली आणि पाच बाद ६५४ धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून एक द्विशतक आणि दोन शतकी खेळी झाल्या. हा कसोटीचा १०वा दिवस होता. जेव्हा १०व्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ४२ धावांची गरज होती. पण वैयक्तीक कारणामुळे इंग्लंडने सर्वांच्या सहमतीने सामना ड्रॉ करण्याची विनंती केली.

वाचा-
इंग्लंडच्या खेळाडूंना समुद्रामार्गे परत जायचे होते. त्यामुळे त्यांनी १४ मार्च रोजी खेळ थांबवला आणि मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. जर इंग्लंडला सामना जिंकायचा असता तर त्यांना दुसऱ्या दिवशी फलंदाजी करावी लागली असती. अखेर टाइम लेस मॅच ड्रॉ झाला. पण क्रिकेटच्या इतिहासात हा सर्वात दिर्घ कसोटी सामना ठरला.

वाचा-
या कसोटी सामन्यात एकूण ४३ तास १६ मिनिटे खेळ झाला. त्यात ५ हजार ४४७ चेंडू टाकले गेले आणि १ हजार ९८१ धावा झाल्या आणि निकाल मात्र ड्रॉ झाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here