वाचा-
करोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट मालिका रद्द झाल्या. यात भारतीय संघाच्या मालिकांचा देखील समावेश होता. याची सुरूवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेने झाली होती. त्यानंतर श्रीलंका आणि झिम्बब्वेविरुद्ध होणारी मालिका बीसीसीआयला रद्द करावी लागली. आता बीसीसीआयवर स्टॉक होल्डरांकडून दबाव टाकला जात आहे की त्यांनी २६ सप्टेंबरच्या आधी क्रिकेट मालिका खेळावी. यात दक्षिण आफ्रिकेचे नाव सर्वात वर येते.
वाचा-
मार्च महिन्यात जेव्हा आफ्रिकेविरुद्धची मालिका स्थगित करण्यात आली होती तेव्हा ही मालिका ऑगस्टमध्ये होईल असे ठरवण्यात आले होते. दोन्ही संघ तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. पण ही मालिका एफटीपीचा भाग नसले. या द्विपक्षीय मालिकेबाबत पटेल यांना विचारले असता ते म्हणाले, या संदर्भात गव्हर्निंग काउंसलिंगच्या बैठकीत चर्चा केली जाईल.
वाचा-
करोना व्हायरसनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात करणार आहे. भारताचा विचार केल्यास या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
वाचा-
पुढील आठवड्यात बीसीसीआयसोबत करार झालेले खेळाडू अहमदाबाद येथे नॅशनल कॅम्पमध्ये एकत्र येतील. या कॅम्पमध्ये खेळाडू एकत्र सराव करणार आहेत. खेळाडू फिटनेसवर काम करतील आणि त्यानंतर आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्याचे ऑगस्टमध्ये आयोजन करू शकेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times