करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला भारताचे क्रिकेटपटू आपल्या घरातच आहेत. पण या गोष्टीला अपवाद ठरला आहे तो भारताचा विश्वविजयी संघातील एक खेळाडू. कारण करोनाच्य काळात तो आपल्या गावात फिरून समाज प्रबोधन करत होता. त्याचबरोबर त्याने गावात काही महत्वाच्या गोष्टीही केल्या आणि आपले गाव करोनामुक्त करून दाखवले. त्यामुळे आता गावातील सर्व लोकं या भारतीय क्रिकेटपटूला प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद देत आहेत.

करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यायची आहे. पण या क्रिकेटपटूने तर चक्क आपल्या पूर्ण गावाची काळजी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमधून काही लोकं या क्रिकेटपटूच्या गावात आली होती. त्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे ही महामारी आता या खेळाडूच्या गावात आली होती. या गोष्टीचा सामना या क्रिकेटपटूने नेमका केला तरी कसा, पाहा…

बाहेरच्या राज्यातून आलेल्या पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे या गावाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले होते. पण गावातील लोकांना करोना व्हायरसबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर काय सुरक्षेचे उपाय करावेत, हेदेखील त्यांना माहिती नव्हते. त्यावेळी हा भारताचा माजी क्रिकेटपटू पुढे सरसावला आणि त्याने गावातील लोकांना करोनाबद्दची पूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर करोनापासून वाचायचे असेल आणि त्यावर विजय मिळवायचा असेल तर नेमके काय करायचे, हे गावात सर्व ठिकाणी फिरुन त्याने सांगितले. त्यामुळे गावातील लोकांना करोनाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी हे सुरक्षेचे उपाय करायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांमध्येच हे गाव करोनामुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व गोष्टीचे श्रेय गावकऱ्यांनी या विश्वविजेत्या क्रिकेटपटूला दिले आहे.

हा क्रिकेटपटू आहे तरी कोण….
गावाला करोनामुक्त करणारा क्रिकेटपटू आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. हा क्रिकेटपटू भारताच्या २०११ साली झालेल्या विश्वविजयात सहभागी होती. गुजरातमधील भरुच जिल्ह्यात इखार नावाच्या गावात तो राहतो. हा भारताचा माजी क्रिकेटपटू आहे मुनाफ पटेल. आतापर्यंत मुनाफ करोनाच्या काळात गावभर फिरून लोकांना माहिती देत होता. त्याच्यामुळेच करोना गावातून पळाला, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता गावकऱ्यांनी मुनाफचे आभारही मानले आहेत.

याबाबत मुनाफ म्हणाला की, ” आमच्या गावातील लोकांना करोनाबद्दल काहीच माहिती नव्हती. एप्रिल महिन्यात तामिळनाडूमधून पाच जणं आमच्या गावात आले आणि त्यांना करोना झाला होता. त्यामुळे गावातील लोकं घाबरलेली होती. त्यांना नेमकं काय करायचं, हे माहिती नव्हतं. मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, हे लोकांना समजावणं कठीण जात होतं. पण गावकऱ्यांनी मला यावेळी चांगली साथ दिली आणि आमचे गाव करोनामुक्त होऊ शकले.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here