Riyan Parag in Ranji Trophy 2022-23 : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युवा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने रणजी ट्रॉफी स्पर्धा 2022-23 (Ranji) मध्ये अफलातून अशी खेळी केली आहे. आसामकडून खेळताना त्याने हैदराबाद संघाविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण करुन 28 चेंडूत 78 धावांची खेळी केली आहे. याशिवाय गोलंदाजीतही त्याने 4 विकेट्स घेत संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत  आज म्हणजेच 28 डिसेंबर रोजी हैदराबाद विरुद्ध आसाम सामन्याचा दुसरा दिवस होता. प्रथम फलंदाजी करताना आसामने पहिल्या डावात 205 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 208 धावांसह 3 धावांची आघाडी घेतली. त्याला प्रत्युत्तर देताना आसामची स्थितीही बिकट झाली. अवघ्या 29 धावसंख्येवर राहुल हजारिकाला कर्णधार कुणाल सेकियासह तंबूत परतावे लागले. त्यानंतर सतत पडणाऱ्या विकेट्समुळे आसाम स्पर्धेत बॅकफूटवर असल्याचं दिसत होतं. मात्र यानंतर रियान परागने अशी तुफानी फलंदाजी केली की सगळे पाहतच राहिले. अवघ्या 28 चेंडूंचा सामना करत त्याने 78 धावांची खेळी केली. ज्यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता, त्याच्या खेळीने आसामला सामन्यात आघाडीवर आणले आहे.सध्या 39 ओव्हर्समध्ये 186 वर 6 बाद धावसंख्येवर आसाम असून 179 धावांची आघाडी घेऊन दुसरा डाव खेळत आहे.


आयपीएल 2023 मध्ये रियान मैदानात

live reels News Reels

रियान पराग आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. यावर्षी झालेल्या मिनी लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला रिटेन केले होते. कारण गेल्या वर्षी त्याने काही महत्त्वाच्या सामन्यात दमदार खेळी खेळल्या होत्या. त्याच वेळी, त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चांगली होती.त्यामुळे हा युवा अष्टपैलू खेळाडू राजस्थानसाठी महत्त्वाचा प्लेअर ठरू शकतात. रियानने आतापर्यंत आयपीएलच्या 37 डावांमध्ये 522 धावा केल्या असून 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

हे देखील वाचा-sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here