६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा शिवछत्रपती क्रिडानगरी म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा आजचा शनिवार हा तिसरा दिवस आहे. आज सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरी खुला गटातील खेळाडूंची वजने घेण्यात आली. वजनाची वेळ संपल्यानंतर पूर्ण गादी आणि माती गटाची भाग्य पत्रिका म्हणजेच लॉट्स तयार करण्याचे काम सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : गादी विभागात सोलापूरच्या मल्लांची सरशी
महाराष्ट्र केसरी खुला गटात गादी विभागामधून ४२ आणि माती विभागामधून ४१ अशा एकूण ८३ मल्लांनी सहभाग नोंदवला आहे.