आयपीएलचा सध्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. युएईमध्ये सप्टेंबर महिन्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण आयपीएल सुरु होणार असल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच वैतागला असून ‘विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’ असे वक्तव्य केले आहे.

आयपीएलमुळे पाकिस्तानला फायदा नाही तर नुकसानच होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलमध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू नसेल. त्याचबरोबर आयपीएल सुरु असताना सर्व देशाचे खेळाडू स्पर्धेत खेळत असतील. त्यामुळे पाकिस्तान कोणत्याही मोठ्या संघाबरोबर मालिका खेळवू शकत नाही. त्यामुळे आयपीएल सुरु झाले तर पाकिस्तानचे दुहेरी नुकसान होणार आहे.

भारत आणइ पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी शोएबने केली होती. त्याला पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंचा चांगलाच पाठिंबा मिळाला होता. पण भारताच्या आजी-माजी खेळाडूंनी शोएबवर टीका केली होती. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका शक्य नाही, असे भारतीय खेळाडूंनी म्हटले होते. भारताबरोबर मालिका झाली असती तर पाकिस्तानच्या खेळाडूंना आणि क्रिकेट मंडळाला चांगलाच फायदा झाला असता. पण तसे झाले नाही. त्यामुळे हा सर्व राग आता शोएब आयपीएलवर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

याबाबत शोएब म्हणाला की, ” भारत आणि पाकिस्तान मालिका होऊ दिली नाही. भारत आणि पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेत खेळणार होते, पण ही स्पर्धाही रद्द करण्यात आली. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार होती, पण तीदेखील रद्द करण्यात आली. हे सर्व कसं घडतं आहे, ते मला माहिती आहे. पण या विषयाच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. एकवेळ विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल मात्र व्हायला हवी. भारताने क्रिकेट वाचवलं पाहिजे, नाहीतर त्यांच्या पुढच्या पिढीली या गोष्टीचा फटका बसू शकतो.”

आयपीएलचे आयोजन आता सुरु झाले आहे. युएईमध्ये खेळाडूंना कसे न्यायचे आणि स्पर्धा कशी खेळवायची, याचा विचार आता सुरु झाला आहे. यावर्षी आयपीएल युएईमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आयपीएल हे २६ सप्टेंबरला आता सुरु होणार नाही, तर १९ सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने रात्री आठ वाजता सुरु होणार, असेही सांगण्यात आले होते. पण युएई आणि भारताची वेळ पाहून आता आयपीएलचे सामना रात्री ७.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here