ICC ODI Cricketer of the Year 2022 nominees : आता 2022 हे वर्ष संपत आले असून वर्षभरात विविध क्रिकेट फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (ICC) केला जात आहे. अशामध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूचा सन्मान केला जाणार आहे. अशामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी चार खेळाडूंना नामांकित करण्यात आलं आहे. पण पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. 

तर पुरुष आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 (ICC Mens ODI Cricketer of the Year) च्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेल्यांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam), ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पा (Adam Zampa), झिम्बाब्वेचा स्टार ऑलराऊंडर सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शाय होप (Shai Hope) यांचं नाव आहे. याा सर्वांच्या वर्षभरातील एकदिवसीय क्रिकेट कामगिरीचा विचार करता बाबरने 9 एकदिवसीय सामन्यात 679 धावा केल्या आहेत. तर सिकंदरने अष्टपैलू कामगिरी करत 8 एकदिवसीय सामन्यात 645 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत. झाम्पाने 12 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या आहेत. तर शाय होपने 21 सामन्यात 709 धावा ठोकल्या आहेत. 


live reels News Reels

महिला क्रिकेटर्समध्ये विचार केला तर दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईल, न्यूझीलंडच्या अमेलिया केर, इंग्लंडच्या नॅट शिवरसह ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हेलीला नामांकित करण्यात आलं आहे. या सर्वांच्या एकदिवसीय कामगिरीचा विचार करता. शबनिमनं 17 एकदिवसीय सामन्यात 37 विकेट्स घेतल्या आहेत. अमेलियानं 18 एकदिवसीय सामन्यात 17 विकेट्स घेत 676 धावा देखील केल्या आहेत. तर नॅटनं 17 एकदिवसीय सामन्यात 11 विकेट्स घेत 833 धावा ठोकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटर अॅलिसानं 12 सामन्यात 629 रन करत 4 स्टम्पिंग आणि 8 झेल घेतले आहेत.


 

हे देखील वाचा-sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here