Pele Demise : महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन (Pele Demise) झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ”आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे.  या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

काही दिवसांपासून पेले यांचे कुटुंबिय  साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात जमा झाले होते. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत ‘बाबा…. माझी ताकद तुमची आहे’ असं कॅप्शन दिलं होतं. तेव्हाच त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर आता अखेर त्यांचं निधन झालं आहे.

फुटबॉल जगतात अनेक फुटबॉलर्सचं विश्वचषक जिंकणं स्वप्न असतं, अशामध्ये तब्बल तीन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू असलेले पेले अखेर हे जग सोडून निघून गेले आहेत. त्यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. याआधी म्हणजे मागील वर्षी पेले यांचा कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. ज्यानंतर आता कॅन्सर उपचारासाठी पेले रुग्णालयात होते. पण मागील काही दिवसांपासून पेले केमोथेरपीला प्रतिसाद देत नव्हते. ज्यानंतर अखेर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. 

live reels News Reels

सप्टेंबर 2021 पासून पेलेंची प्रकृती ढासळली होती

पेले यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. पेले यांच्या कोलनमध्ये ट्यूमर होता. तेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये ये-जा करू लागले.  

पेले फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानलं जात होतं. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी एक-दोन नाही तर तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून पेले यांनी जवळपास 1282 गोल मारले होते.

हे देखील वाचा-

sports

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here