पंतच्या गाडीला झालेल्या अपघाताचे फोटो इतके भीषण आहेत की त्यावरून घटना किती भीषण होती याचा अंदाज येतो. पंतचे देखील रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्याची दुखापत गंभीर असल्याचे दिसते.
वाचा- २०व्या शतकातील महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन; ८२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अपघातावेळी पंत स्वत: गाडी चालवत होता अशी प्राथमिक माहिती मिळते. तसेच त्याच्यासोबत काही मित्र देखील होते पण त्याबाबत अधिक काही माहिती मिळाली नाही. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने रुकडी येथील सिव्हिल रुग्णालयात पंतला दाखल केले. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस अधिक्षक किशोर सिंह घटनास्थळी दाखल झाले. पंतची दुखापत पाहता त्याला मॅक्स देहरादून येथे हलवण्यात आले. दरम्यान गरज वाटली तर त्याला दिल्लीत हलवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
वाचा-पेले यांना त्यांचे ‘टोपणनाव’ कधीच आवडले नाही; हे नाव कसे पडले, कोणी दिले?

रेलिंगला धडक दिली त्यानंतर गाडीने पेट घेतला. BMW ही गाडी संपूर्ण जळून खाक झाली. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पंतची दुखापत फार गंभीर असेल तर तो मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर होता. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-२० मालिकेत त्याला संघातून वगळण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे पंतला वगळण्यात आल्याची चर्चा आहे.
वाचा-क्रिकेटर रिषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, अपघातानंतर BMW कारने पेट घेतला!
पंतची आतापर्यंतची कामगिरी
ऋषभ पंतने भारताकडून ३३ कसोटीत ५ शतकासह २ हजार २७१ धावा केल्या आहेत. ३० वनडेत एका शतकासह ८६५ धावा तर ६६ टी-२० सामन्यात ३ अर्धशतकांसह ९८७ धावा केल्या आहेत. बांगलादेश दौऱ्यात त्याने अखेरची कसोटी खेळली होती. पहिल्या डावात ९३ तर दुसऱ्या डावात त्याने ९ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.