भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता, असे म्हटले जायचे. त्यामुळे कुंबळे यांना फक्त एकच वर्ष भारताचे प्रशिक्षकपद भूषवता आले आणि त्यानंतर त्यांना नारळ देण्यात आला. कुंबळे यांनी याबाबत आज एक मोठा खुलासा केल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-

अनिल कुंबळे यांनी एक वर्षे प्रशिक्षकपद भूषवले असले तरी त्यांनी यामध्ये चमकदार कामगिरी केली होती. कुंबळे यांच्या कार्यकाळात भारताने कसोटी, ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. पण भारताला या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु झाली होती. कारण कुंबळे यांचा कार्यकाळ संपत आला होता. दुसरीकडे कोहलीला प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हवे होते, असे म्हटले जात होते. त्यामुळे कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असताना भारत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पराभूत झाला आणि बीसीसीआयने नवीन प्रशिक्षक नेमण्याची तयारी सुरु केली. त्यानंतर कोहलीच्या आग्रहामुळे शास्त्री यांनाच प्रशिक्षकपद देण्यात आले, असेही म्हटले जात आहे आणि तसेच घडल्याचेही पाहायला मिळाले.

कुंबळे यांनी याबद्दल सांगितले की, ” मी एक वर्षच भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. या वर्षभरात एक प्रशिक्षक म्हणून माझ्याकडून चांगलं काम झालं आणि त्याबद्दल मी समाधानी आहे. या एका वर्षात मला भारतीय संघातील खेळाडूंच्या जवळ जाता आहे, त्यांना परखता आले. भारतीय संघाचा ड्रेसिंग रुम शेअर करणे, ही माझ्यासाठी मोलाची गोष्ट होती. पण माझ्या या कार्यकाळाचा शेवट झाला तो मात्र मला आवडला नाही. कारण यापेक्षा जास्त चांगला शेवट माझ्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचा नक्कीच झाला असता, असे मला वाटते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here