गुवाहाटी : पुढारी ऑनलाईन
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला उद्या (रविवार) सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या मालिकेबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
उभय संघांमध्ये आतापर्यंत सहा टी-२० मालिका झाल्या आहेत. यातील पाच मालिकेत टीम इंडियाने विजय मिळवला असून एक मालिका बरोबरीत सुटली आहे. २०१७ मध्ये दोन्ही संघांमध्ये अखेरची टी-२० मालिका झाली होती. टीम इंडियाने या मालिकेत श्रीलंकेच्या संघाला क्लिन स्विप देत मालिका ३-० जिंकली होती. आता तब्बल दोन वर्षानंतर टीम इंडिया व श्रीलंका आमनेसामने येत आहेत.