यंदाच्या आयपीएलमध्ये काही गोष्टी नवीन पाहायला मिळू शकतात. यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये एक नवीन गोष्ट पाहायला मिळणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गोष्ट यावेळी आयपीएलमध्ये केली जाणार असल्याचे समजते.

आयपीएलमध्ये समाचोलकही मजा करत असतात. त्यांचे नवीन पेहराव आणि खेळाडूंबरोबरच्या त्यांच्या मुलाखती चांगल्याच रंगतात. पण यावेळी मात्र तसे दिसणार नसल्याचे समजत आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये वर्चुअल कॉमेंट्री पाहायला मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

यापूर्वी कधी झाला असा प्रयोगकाही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये एक ३६ षटकांचा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात तीन संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्याचे समालेचन भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर, इरफान पठाण आणि दीपदास गुप्ता यांनी केले होते. पण हे समाचोलक त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत नव्हते, तर त्यांनी आपल्या घरात बसून हे समाचोलन केले होते. मांजरेकर मुंबईतून, इरफान बडोद्यातून आणि दीपदास कोलकात्यामधून या सामन्याचे समालोचन करत असल्याचे पाहायला मिळाले होते. हा एक वेगळाच अनुभव या समालोचकांसाठी असल्याचे म्हटले जात आहे. या सामन्याच्या धर्तीवरच आता आयपीएलमधील समाचोलकही घरूनच आपले काम करणार असल्याचे पाहायला मिळू शकते.

यावर्षी आयपीएल युएईमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आयपीएल हे २६ सप्टेंबरला आता सुरु होणार नाही, तर १९ सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने रात्री आठ वाजता सुरु होणार, असेही सांगण्यात आले होते. पण युएई आणि भारताची वेळ पाहून आता आयपीएलचे सामना रात्री ७.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे. यापूर्वीही युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे युएईला आयपीएलच्या आयोजनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच श्रीलंकेचा पर्याय खुला असताना बीसीसीआयने युएईला पसंती दिल्याचे समजत आहे. आता तेथील सरकार आणि क्रिकेट संघटना बीसीसीआयला कसा पाठिंबा देते, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द होईपर्यंत बीसीसीआय आयपीएल खेळवू शकत नव्हती. पण आता विश्वचषकही पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण बीसीसीआयलाही काही मर्यादा आहेत आणि त्यामध्येच राहून त्यांना आपले काम करावे लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here