Rishabh Pant Car Accident : कोण कधी कोणाच्या मदतीला येईल हे सांगता येत नाही…आणि याचाच प्रत्यय आला ऋषभ पंतच्या (Rishab Pant car accident) अपघातानंतर समोर आलेल्या माहितीतून… भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. पण त्याच वेळी देवदूताच्या रुपात हरयाणा रोडवेजच्या एका ड्राईव्हरने आपली बस तात्काळ थांबवत पंतच्या गाडीजवळ धाव घेतली, त्याला उचलून गाडीपासून दूर नेलं, एक चादर लपेटून दिली आणि मदतीसाठी फोन करुन पंतला रुग्णालयात पोहोचवलं…
नेमकं काय घडलं?
हरिद्वारचे एसएसपी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी अपघात झाला तेव्हा हरयाणा रोडवेजची बस तिथून जात होती. अपघात पाहून लगेचच बसचालक सुशील कुमारने बस थांबवली आणि 112 नंबरवर मदतीसाछी फोन करत पंतला रुग्णालयात पोहचवण्यात मदत केली. दरम्यान सुशील कुमारने आज तक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं की…”मी हरयाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. मी हरिद्वारवरुन येत होतो. तेव्हा मी नारसनजवळ पाहिलं की दिल्लीजवळू येणीर एक कार 60-70 च्या स्पीडवर असताना डिव्हायडरला धडकली.. मला वाटलं माझी बसही आता धडकेल पण मी कशी बशी बस बाजूला घेतली आणि उडी मारुन गाडीतील व्यक्तींना मदत कऱण्यासाठी पोहोचलो. कारमधून आग निघत होती आणि शेजारी एक व्यक्ती उभा होता, मी त्याला आणखी कोणी गाडीत आहे का? असं विचारलं तो नाही म्हणाला आणि मी ऋषभ पंत आहे असंही म्हणाला…मला क्रिकेटबाबत जास्त माहित नव्हतं. मी त्याच्या अंगावर एक चादर दिली आणि रुग्णालयात पोहचवलं.”
News Reels
पाहा VIDEO-
Brave pant after accident.. he broke the car glass and get out..
Get well soon Champion #RishabhPant #Pant pic.twitter.com/RhJwbnG3hz
— Gaurav Pandey (@gaurav5pandey) December 30, 2022
पंतच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयची माहिती
बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे.असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.
हे देखील वाचा-
sports
Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.
I have read your article carefully and I agree with you very much. So, do you allow me to do this? I want to share your article link to my website: gate io