PM Narendra Modi: पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज मातृवियोगाच्या दु:खाला सामोरं जावं लागलं. हिराबेन मोदी (Heeraben Modi) अनंतात विलीन झाल्या. या अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटपटू ऋषभ पंतला धीर दिला आहे. शुक्रवारी सकाळी ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आई हिराबेन मोदी यांचं निधन झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, दु:खामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ऋषभ पंत याला धीर दिला आहे. 

ऋषभ पंतच्या अपघातानंतर सर्वसामान्यांपासून क्रिकेटपटू ते राजकीय नेत्यांनी ट्वीट करत धीर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ऋषभ पंत लवकर बरा होईल, असं म्हटलेय.  क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताने व्यथित झालो आहे. मी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्वीट करत पंतला धीर दिला आहे. 

 

 

ऋषभ पंतच्या अपघातामध्ये क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे. भारतासह विदेशातील खेळाडूंनी ऋषभ पंतच्या अपघातानंतर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याशिवाय ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलेय. 

पाहा कोण काय म्हणाले?

 

आणखी वाचा;

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतच्या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर, गाडी डिव्हायडरला धडकली अन् काही क्षणाताच भस्मसातsports

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here