Rishabh Pant and Shikhar Dhawan Video : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे, पंतच्या अपघातानं संपूर्ण क्रिडाविश्वात खळबळ माजली आहे. अनेकजण पंतच्या सलामतीसाठी प्रार्थना करत आहेत..पंत सध्या नियतीशी झुंज देत रुग्णालयात उपचार घेत आहे…पण पंतवर ही वेळच आली नसती जर त्याने शिखर धवन (Shikhar Dhawan) याचा एक सल्ला ऐकला असता…धवन आणि पंत यांच्यातील आयपीएल दरम्यानच्या एका मजेशीर मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून शिखरने पंतला गाडी कमी वेगात चालवण्याचा सल्ला या व्हिडीओत दिला होता…

भारतीय संघातील डावखुरा फलंदा पंत क्रिकेटचं मैदान असो किंवा गाडीचं स्टेअरिंग कायम टॉप गिअरमध्येच असतो. पण याच वेगानं त्याच्यावर आता रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. पंतच्या गाडीला अपघात झाल्यानं पंत गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या दरम्यान धवनने त्याला गाडी कमी वेगात चालवण्याचा सल्ला दिलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सकडून दोघेही आयपीएल खेळतानाचा आहे. एका मजेशीर मुलाखतीत पंत वेगवेगळे प्रश्न शिखरला विचारतो. यातील एका प्रश्नात पंत शिखरला ”मला काय सल्ला देशील?” असं विचारलं असता गाडी थोडी कमी वेगात चालव असा सल्ला शिखरनं दिला. दरम्यान पंतनेही मी हे नक्की ऐकेन असं मान्य केलं होतं. पण याच वेगानं पंतचा अपघात झाला आहे आणि आता तो लवकर बरा होवो अशी प्रार्थना अवघं क्रिकेट जगत करत आहेत. 

पाहा VIDEO-

live reels News Reels

पंतच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयची माहिती

बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे.असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here