Bus Driver Sushil Kumar News : ऋषभ पंतच्या (Rishab Pant) अपघातानंतर अगदी देवदूताप्रमाणे हरयाणा रोडवेजचा बसचालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत त्याठिकाणी पोहोचले, त्यांनी तात्काळ आपली बस थांबवत पंतच्या गाडीजवळ धाव घेतली, त्याला उचलून गाडीपासून दूर नेत एक चादर लपेटून दिली आणि मदतीसाठी फोन करुन पंतला रुग्णालयात पोहोचवलं, त्यांच्या या मदतीमुळेच पंतचे प्राण वाचू शकले असल्याने सध्या देशभरात या दोघांची चर्चा असून हरयाणा सरकार त्यांचा भव्य सत्कारही करणार आहे.

तर 30 डिसेंबर रोजी पहाटे ऋषभ पंत स्वतःची मर्सिडीज कार घेऊन त्याचं मूळ गाव रुरकीला कुटुंबाकडे निघाला होता. कार चालवताना त्याचा डोळा लागला आणि त्याची कार रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. पंतने स्वत: सांगितले की, तो काच तोडून बाहेर आला. त्यानंतर गाडीला भीषण आग लागली. दरम्यान त्याच दरम्यान तेथून जाणाऱ्या एका बसच्या चालकासह कंडक्टरने लगेच तिथे पोहोचत पंतला मदत केली. पंतला कारमधून बाहेर काढणारे हे हरयाणा रोडवेजचे बस ड्रायव्हर सुशील आणि कंडक्टर परमजीत पानिपत डेपोत कार्यरत आहेत.

चालकाच्या समजुतीमुळे वाचले पंतचे प्राण

सुशील कुमारने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की…”मी हरयाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. मी हरिद्वारवरुन येत होतो. तेव्हा मी नारसनजवळ पाहिलं की दिल्लीजवळू येणीर एक कार 60-70 च्या स्पीडवर असताना डिव्हायडरला धडकली.. मला वाटलं माझी बसही आता धडकेल पण मी कशी बशी बस बाजूला घेतली आणि उडी मारुन गाडीतील व्यक्तींना मदत कऱण्यासाठी पोहोचलो. कारमधून आग निघत होती आणि शेजारी एक व्यक्ती उभा होता, मी त्याला आणखी कोणी गाडीत आहे का? असं विचारलं तो नाही म्हणाला आणि मी ऋषभ पंत आहे असंही म्हणाला…मला क्रिकेटबाबत जास्त माहित नव्हतं. मी त्याच्या अंगावर एक चादर दिली आणि रुग्णालयात पोहचवलं.”

live reels News Reels

  

सरकार करणार सत्कार

दरम्यान सुशील कुमार आणि परमजीत यांचा पानिपत रोडवेजचे जीएम कुलदीप जांगरा यांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला आहे. या दोघांनी ऋषभ पंतचा जीव वाचवून एक मोठा आदर्श सर्वांसमोर ठेवल्याचे म्हटले जात आहे. दोघांनी आपल्या कृतीतून मानवतेचा परिचय दिला आहे. दरम्यान हरयाणा राज्याचे परिवहन मंत्री मूलचंद शर्मा यांनीही याबाबत चर्चा केल्याचे समोर आले असून त्यांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरची माहिती मागवली आहे. बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा सरकारतर्फे सन्मान करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

व्हीव्हीएस लक्ष्मणंही केलं ट्वीट

सुशील कुमार याचे संपूर्ण देश आभार मानत असून माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही ट्वीट करत सुशील कुमारचा फोटो पोस्ट केला आहे. तसंच कॅप्शनमध्ये सुशील कुमारचे आभार देखील मानले आहेत,

हे देखील वाचा-sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here