Happy New Year 2023 : आगामी वर्ष म्हणजेच 2023 क्रीडा जगतासाठी खूप खास असणार आहे. क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल या खेळांमध्ये भव्य स्पर्धा या वर्षात होतील. 2023 मध्ये एकूण चार विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यात क्रिकेट विश्वचषक, हॉकी विश्वचषक, फुटबॉल महिला विश्वचषक आणि महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे. यासह पहिली महिला इंडियन प्रीमियर लीग देखील आयोजित केली जाणार आहे.

2023 हे वर्ष भारतासाठी आणखी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यावेळी एकदिवसीय क्रिकेट आणि हॉकी विश्वचषकाचे आयोजन भारतात होणार आहे. यासोबतच पहिल्या महिला आयपीएलचे आयोजन ही भारत करणार आहे. जागतिक बॉक्सिंग आणि नेमबाजी विश्वचषकाचे यजमानपदही भारताकडेच असेल. त्यामुळे हे वर्ष क्रीडा जगतासाठी आणि खासकरुन भारतासाठी खूप खास असणार आहे. विशेष म्हणजे 2023 हे वर्ष महिलांसाठी आणखी खास असेल. या वर्षी प्रथमच महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच महिला आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. बीसीसीआयची ही महत्त्वाची स्पर्धा 5 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. यामध्ये जवळपास 25 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. भारत क्रिकेट आणि हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यासोबतच बॉक्सिंग आणि नेमबाजी विश्वचषकही येथे होणार आहे. जानेवारीमध्ये हॉकी विश्वचषक, मार्चमध्ये महिला विश्व बॉक्सिंग, ऑगस्टमध्ये नेमबाजी विश्वचषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे.

2023 मधील भव्य क्रीडा स्पर्धा –

  • पुरुष हॉकी विश्वचषक – 13 ते 29 जानेवारी, भारत
  • महिला T20 विश्वचषक – 10 ते 26 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका
  • विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप – 3 ते 16 जुलै, इंग्लंड
  • महिला फुटबॉल विश्वचषक – 20 जुलै ते 20 ऑगस्ट, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड
  • जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप – 21 ते 27 ऑगस्ट, डेन्मार्क
  • आशियाई खेळ – 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर, चीन
  • पुरुष क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक – ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, भारत

हे देखील वाचा-

live reels News Reels

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here