Rishabh Pant Accident : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भीषण कार अपघातात जखमी झालेला भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. पंतच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन अर्थात DDCA च्या टीमने ही माहिती दिली आहे. पंत च्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितले असून आणखी उत्तम उपचारांची आवश्यकता असल्यास, त्याला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्टही केले जाऊ शकते असंही त्यांनी सांगितलं.

भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची प्रकृती जाणून घेण्यासाठी DDCA टीम शनिवारी डेहराडून मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्याच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर डीडीसीए टीमने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या उपचाराने आम्ही समाधानी आहोत. पंतला येथून हलवण्याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. बीसीसीआयचे डॉक्टरही सतत संपर्कात आहेत. जर पंतला आणखी चांगल्या उपचारांची आवश्यकता असेल, तर त्याला इथून दुसरीकडे हलविले जाऊ शकते.

डीडीसीएने दिलेल्या या माहितीनंतर भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अपघात झाल्यापासून भारतभरातील क्रिकेट चाहते पंत लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. दरम्यान काल रात्री पंतच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. ज्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला ज्यामुळेही भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

घोट्याचा आणि गुडघ्याचा एमआरआय अजून बाकी

live reels News Reels

रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतच्या गुडघा आणि घोट्याचे एमआरआय स्कॅन अद्याप झालेले नाही. सध्या त्याच्या पायाला सूज असून वेदना होत आहेत. पंतची सूज आणि वेदना अजून कमी झालेली नाही. त्यामुळे एमआरआय स्कॅन होऊ शकलेला नाही. 

देवदूत बनून आला बसचालक सुशील कुमार

अपघात झाला तेव्हा एका बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने पंतचे प्राण वाचू शकले आहेत. अपघात झाला तेव्हा रस्त्यावरुन जाणाऱ्या हरयाणा रोडवेजचा बसचालक सुशील कुमारने बस थांबवली आणि 112 नंबरवर मदतीसाछी फोन करत पंतला रुग्णालयात पोहचवण्यात मदत केली. दरम्यान सुशील कुमारने आज तक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं की…”मी हरयाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. मी हरिद्वारवरुन येत होतो. तेव्हा मी नारसनजवळ पाहिलं की दिल्लीजवळू येणीर एक कार 60-70 च्या स्पीडवर असताना डिव्हायडरला धडकली.. मला वाटलं माझी बसही आता धडकेल पण मी कशी बशी बस बाजूला घेतली आणि उडी मारुन गाडीतील व्यक्तींना मदत कऱण्यासाठी पोहोचलो. कारमधून आग निघत होती आणि शेजारी एक व्यक्ती उभा होता, मी त्याला आणखी कोणी गाडीत आहे का? असं विचारलं तो नाही म्हणाला आणि मी ऋषभ पंत आहे असंही म्हणाला…मला क्रिकेटबाबत जास्त माहित नव्हतं. मी त्याच्या अंगावर एक चादर दिली आणि रुग्णालयात पोहचवलं.” 

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here