Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीम इंडियात पदार्पणापासूनच टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आतातर त्याल थेट संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सूर्यानं हे सारंकाही अवघ्या दीड वर्षात मिळवलं आहे. त्याने संघाचा उपकर्णधार होण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. सध्या तो आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. या वर्षी सूर्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज ठरला आहे. 2022 मध्ये, त्याने 187.43 च्या स्ट्राइक रेटने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत धावा केल्या आहेत. तर टीम इंडियात पदार्पण आणि नंतर जवळपास दीड वर्षात संघाचा उपकर्णधार झालेल्या सूर्याच्या प्रवासावर एक नजर फिरवू…

2021 मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण

मुंबईकर सूर्यकुमार यादवने 14 मार्च 2021 रोजी भारतीय संघासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या जवळपास 20 महिन्यांनंतर आता तो T20 आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. 2 नोव्हेंबर 2022 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय T20 चा नंबर वन फलंदाज होण्याचा मान मिळवला. यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजेच काही दिवसांपूर्वी 27 डिसेंबरला त्याला आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं. 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या देशांतर्गत टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पदार्पणाच्या दीड वर्षातच सूर्याला भारतीय संघाचा उपकर्णधार होण्याचा मान मिळाला आहे.

सूर्यकुमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 

live reels News Reels

सूर्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 44 च्या सरासरीने आणि 180.98 च्या स्ट्राइक रेटने 1408 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतकं आणि 12 अर्धशतकं निघाली आहेत. तर जुलै 2021 मध्ये, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून, सूर्याने भारतासाठी एकूण 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32 च्या सरासरीने 384 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 अर्धशतकं सूर्यानं झळकावली आहेत.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here