IND vs SL Series : श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून भारतीय संघ (Team India) 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. मंगळवार म्हणजेच 3 जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) काही दिवसांपूर्वी संघ जाहीर केला. दरम्यान आता सामने सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असून त्यापूर्वी या मालिकेबद्दलची सर्व माहिती पाहूया… 

सर्वात आधी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मंगळवारी अर्थात 3 जानेवारीपासून टी20 मालिकेला सुरुवात करणार आहे. 3,5 आणि 7 जानेवारीला टी20 मालिका खेळल्यानंतर मग एकदिवसीय मालिका भारत खेळणार आहे. यावेळी संघाचा फुलटाईम कर्णधार रोहित शर्मा दिग्गज खेळाडूंना घेऊन मैदानात उतरेल. 10,12 आणि 15 जानेवारीला भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामने खेळवले जातील. 

दोन्ही मालिकेसाठी कसे आहेत संघ?

भारताचा टी20 संघ-

live reels News Reels

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार 

भारताचा एकदिवसीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह 

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका-





सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला एकदिवसीय सामना 3 जानेवारी  वानखेडे स्टेडियम, मुंबई  सायंकाळी 7 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना 5 जानेवारी  एमसीए स्टेडियम, पुणे सायंकाळी 7 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना 7 जानेवारी  सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट सायंकाळी 7 वाजता

टी20 मालिका-





सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला टी20 सामना 10 जानेवारी  बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी  दुपारी 2 वाजता
दुसरा टी20 सामना 12 जानेवारी  ईडन गार्डन्स, कोलकाता दुपारी 2 वाजता
तिसरा टी20 सामना 15 जानेवारी 

ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम

दुपारी 2 वाजता

कुठे पाहू शकता सामने लाईव्ह?

भारत आणि श्रीलंका मालिकेतील सर्व सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here