Team India Schedule : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करत 2022 ची सांगता आनंदी केली आहे. ज्यानंतर आता भारतीय संघाचे खेळाडू आठ दिवसांच्या विश्रांतीवर असतील, त्यानंतर टीम इंडिया (Team india) पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने भारत 2023 ची सुरुवात करेल. भारतीय खेळाडूंसाठी 2023 वर्ष अगदी व्यस्त असणार आहे0. 2023 मध्ये भारतीय संघाचं वेळापत्रक कसं असेल जाणून घेऊ…

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका 03 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. ती पूर्ण  झाल्यानंतर लगेचच तीन दिवसांनी, न्यूझीलंडबरोबर  तितक्याच सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका 1 फेब्रुवारीला संपेल.  त्यानंतर 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत मोठी आणि महत्त्वाची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 24 मार्चपासून होणार आहे. या दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

आयपीएलचा थरार

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका संपल्यानंतर लगेचच खेळाडूंना आयपीएलसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. आयपीएलचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु महिला आयपीएलचा पहिला हंगाम संपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयपीएलचा 16 वा हंगाम सुरू होऊ शकतो. जवळपास अडीच महिने आयपीएलमध्ये व्यस्त राहिल्यानंतर खेळाडूंना छोटा ब्रेक मिळणार आहे.

live reels News Reels

वर्षाच्या अखेरीस आशिया चषक आणि वर्ल्ड कप

आयपीएलनंतर ब्रेक झाल्यावर आशिया कपमध्ये भारत सहभागी होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशिया चषकाचे यजमानपद द्यायचे आहे, मात्र सध्या यजमान राष्ट्राचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. सप्टेंबरमध्ये आशिया चषक संपल्यानंतर भारतीय संघाला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही सहभागी व्हायचे आहे. एकदिवसीय विश्वचषक 10 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे.

वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध सामन्यांचा थरार

एकदिवसीय मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला एकदिवसीय सामना 3 जानेवारी  वानखेडे स्टेडियम, मुंबई  सायंकाळी 7 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना 5 जानेवारी  एमसीए स्टेडियम, पुणे सायंकाळी 7 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना 7 जानेवारी  सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट सायंकाळी 7 वाजता

टी20 मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला टी20 सामना 10 जानेवारी  बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी  दुपारी 2 वाजता
दुसरा टी20 सामना 12 जानेवारी  ईडन गार्डन्स, कोलकाता दुपारी 2 वाजता
तिसरा टी20 सामना 15 जानेवारी 

ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम

दुपारी 2 वाजता

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here