Rishabh Pant Replacement in Australia Series: भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला. पंतवर सध्या डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत पुढील तीन ते सहा महिने मैदानात उतरू शकणार नाही. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत खेळताना दिसणार नाही. दरम्यान, पंतच्या जागेवर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागलीय. या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

केएस भारत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ऋषभ पंतच्या जागेवर केएस भारतला संधी देली जाऊ शकते. प्रथम श्रेणीतील त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्यानं आतापर्यंत 84 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 9 शतकांच्या मदतीनं 4 हजार 533 धावा केल्या आहेत. केएल भारतची भारतीय संघात समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे.

संजू सॅमसन
ऋषभ पंतच्या जागेवर भारतीय संघात स्थान मिळवण्याबाबत संजू सॅमसनचं नाव आघाडीवर आहे. ऑ्स्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. संजूच्या कारकिर्दीवर नजर टाकली असता त्यानं भारतासाठी 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 66 च्या दमदार सरासरीनं 330 धावा केल्या आहेत. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 16 सामने खेळळे आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये त्यानं 21.14 च्या सरासरीनं 296 धावा केल्या आहेत.

ईशान किशन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतच्या जागी इशान किशनलाही संधी मिळू शकते. नुकतेच त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं. तसेच रणजी ट्रॉफीमध्ये वेगवान शतक ठोकलं होतं. त्याची खेळण्याची शैलीही पंतसारखीच आहे. अशा स्थितीत पंतच्या जागी त्यालाही भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. 

live reels News Reels

भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक:






सामना तारिख ठिकाण
पहिला कसोटी सामना 09-11 फेब्रुवारी नागपूर
दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी दिल्ली
तिसरा कसोटी सामना 01-05 मार्च धर्मशाला
चौथा कसोटी सामना 09-11 मार्च अहमदाबाद

 

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here