वाचा-
ईस्ट बंगालचा माजी कर्णधार असलेल्या मेहताबला बुधवारी प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाच्या मुरलीधर सेन लेन येथील कार्यालयात भारत माता की जय या घोषणांसह पक्षाचा झेंडा हाती दिला होता. मेहताबच्या प्रवेशाची चर्चा झाली होती. पण त्यानंतर फक्त २४ तासात त्याने निर्णय बदलला.
मेहताबने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, आजपासून मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. राजकारणातील प्रवेशाच्या निर्णयाबद्दल मी सर्व चाहत्यांची माफी मागतो. मी अचानक घेतलेल्या राजकीय निर्णयामुळे कुटुंबातील सदस्य आणि चाहते यांना त्रास झाल्याचे त्याने म्हटलय.
वाचा-
राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय मी कोणाच्याही दबावामुळे घेतला नाही. राजकारणापासून दूर राहण्याचा माझा वैयक्तीक निर्णय आहे असल्याचे त्याने सांगितले. मी राजकारणात यासाठी आलो होतो की मला लोकांशी जोडायचे होत.
मेहताबने भारताकडून खेळताना ३० सामन्यात दोन गोल केले आहेत.
या कठीण परिस्थितीत मला लोकांसोबत रहायचे आहे. मजूरांचे चेहरे पाहिल्यानंतर माझी झोप उडाली. यामुळे मी अचानक राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पण मला ज्या लोकांची सेवा करायची आहे त्यांची इच्छा नाही की मी राजकारणात जावे. ते मला राजकारणी म्हणून पाहत नाहीत, असे तो म्हणाला.
वाचा-
भाजपचा आरोप…
मेहताबने २४ तासात राजकारण सोडल्याच्या निर्णयावर भाजपने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. तृणमूलने धमकी दिल्यामुळे मेहताबने युटर्न घेतलाय. भाजप नेता सयांतन बसू म्हणाले, टीएमसीने धमकी दिल्याने त्याने हा निर्णय घेतला. याआधी देखील अशा घटना झाल्या आहेत. टीएमसी जेवढ्या प्रमाणात अशा गोष्टी करतील तितक्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा गमावेल. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सूव्यवस्थेची स्थिती किती बिघडली आहे याचा अंदाज येतो, असे भाजपचे उप प्रदेशाध्यक्ष जय प्रकास मजूमदार यांनी सांगितले. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चटर्जी यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times